Ad will apear here
Next
‘बौद्धिक संपदेबाबत भारतीयांनी सजग राहायला हवे’
प्रा. गणेश हिंगमिरे यांचे मत
प्रा. गणेश हिंगमिरे यांचे स्वागत करताना विनय र. र.

पुणे : ‘भारतीय लोकांची बुद्धिमत्ता पाहता आपल्याकडे सर्वाधिक पेटंट असायला हवेत; परंतु जागरूकतेच्या अभावामुळे इतर देशांच्या तुलनेत भारतात खूप कमी पेटंट आहेत. आपण केलेल्या कामाचे श्रेय आपल्याकडे राहावे, यासाठी पेटंट किंवा स्वामित्व हक्क असणे गरजेचे असते. त्यामुळे भारतीयांनी संशोधन करतानाच बौद्धिक संपदा, पेटंट किंवा कॉपीराईट याबाबत सजग होणे गरजेचे आहे,’ असे मत या क्षेत्रातील अभ्यासक प्रा. गणेश हिंगमिरे यांनी व्यक्त केले.

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नवीन शोध, बौद्धिक संपदा व पेटंट’ या विषयावर प्रा. गणेश हिंगमिरे यांचे व्याख्यान झाले. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात झालेल्या या व्याख्यानावेळी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रा. विनय र. र., उपाध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ आदी उपस्थित होते. 

प्रा. गणेश हिंगमिरे म्हणाले, ‘जे मूळचे आपले आहे, अशा वैशिष्टयपूर्ण गोष्टींचे पेटंट बाहेरच्या देशातील कंपन्या घेतात व त्यावर आपला हक्क सांगतात. त्यामुळे भारतीयांनी आपल्या अधिकाधिक गोष्टींचे पेटंट मिळवायला हवे. तरुण शास्त्रज्ञांनी पेटंटबाबत सतर्क राहून जनजागृती करावी. एक पेटंट म्हणजे एक ‘इंडस्ट्री’ म्हणायला हरकत नाही. पेटंट मिळाल्यावर उद्योगाचा जन्म होतो. शेकडो लोकांना रोजगार मिळतो. हजारो रुपयाचे उत्पन्न निर्माण होते; तसेच पेटंट झालेल्या वस्तूचा समाजालाही फायदा होतो.’

प्रस्तावना करताना प्रा. राजेंद्रकुमार सराफ

‘परकीय देशातील कंपन्या अधिकाधिक पेटंट स्वतःच्या नावावर करून घेतात. अमेरिकेसारख्या देशात एका कंपनीच्या नावावर शेकडो पेटंट असतात, त्या तुलनेत संपूर्ण भारताचा विचार केला, तर खूप गोष्टींचे पेटंट आपल्या नावावर आहेत. आयआयटीमध्ये पेटंट संस्कृती रुजू लागली आहे, ही सकारात्मक बाब आहे. बौद्धिक  संपदा हा राजमार्ग आहे. तुमच्या नावावर असलेली तुमच्या हक्काची बौद्धिक संपदा चोरीला जाण्याचे प्रकारदेखील मोठया प्रमाणात होतात. त्याचे पेटंट असेल, तर कायदेशीर कारवाई करून नुकसानभरपाई मिळू शकते. पेटंट, कॉपीराईट याबाबत शालेय शिक्षणात समावेश करण्याची गरज आहे.’असेही त्यांनी नमूद केले.

प्रा. विनय र. र म्हणाले, ‘पेटंटच्या संकल्पनेचा जाणीवपूर्वक वापर केला जावा. नवीन गोष्टी सापडल्या की त्याचे पेटंट तयार करून घेणे महत्त्वाचे आहे. आपण निर्मिलेल्या गोष्टी चोरल्या जाऊ नये म्हणून काळजी घ्यावी.’

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZGWCC
Similar Posts
‘बौद्धिक संपदा व पेटंट’ विषयावर प्रा. हिंगमिरे यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या वतीने ‘नवीन शोध, बौद्धिक संपदा व पेटंट’ या विषयावर प्रा. गणेश हिंगमिरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ विषयावर डॉ. श्रुती पानसे यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ (एमकेसीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेंदू आणि व्यक्ती विकास’ या विषयावर डॉ. श्रुती पानसे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले आहे. मयूर कॉलनीतील इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनच्या सभागृहात गुरुवारी, २८ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ६.१५ वाजता हे
जागतिक बौद्धिक संपदा दिनानिमित्त जनजागृती पुणे : मानवी बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचे रक्षण करण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दर वर्षी २६ एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिन साजरा केला जातो. या निमित्ताने पुण्यात भारती विद्यापीठाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भारताला विविध वस्तूंची पेटंट मिळवून देणारे प्रा
‘ज्ञानार्जनाला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक’ पुणे : ‘आज तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. मोबाइलसारख्या उपकरणाच्या मदतीने अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. तेव्हा शिक्षकांनी अधिकाधिक ‘स्मार्ट’ होत अध्यापन करावे. ज्ञानार्जन करताना त्याला नवतंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुकर आणि आनंददायी होईल,’ असे मत महाराष्ट्र ज्ञान

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language